इथे ओशाळला बालमृत्यू


ithe oshaLala baalmRutyU - by Hemant Karnik

इथे ओशाळला बालमृत्यू – हे हेमंत कर्णिक ह्यांचे छोटेसे (७९ पाने) पुस्तक. अभय बंग व राणी बंग ह्यांच्या SEARCH संस्थेने हाती घेतलेल्या “अंकुर” ह्या प्रकल्पातील प्रत्यक्ष अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहेत. पुस्तक साध्या, सोप्या शब्दात आहे – वृत्तांत लिहिल्यासारखे (पण अनिल अवचटांसारखी चित्रमय reportage शैली नाही), ब‍र्‍याच वेळा एखाद्या शासकीय माहितीपत्रासारखे वाटते (मी हेमंत कर्णिक ह्यांचे इतर लिखाण अजून वाचले नाही, त्यामुळे त्यांच्या शैलीविषयी खास माहिती नाही.) – पण तरीही पुस्तक गुंतवून ठेवते ते त्यातील अनुभवांच्या अस्सलपणामुळे आणि उपायांच्या परिणामकतेमुळे.

अभय बंग व राणी बंग ह्यांचे नाव “माझा साक्षात्कारी हृद्‍यरोग”, “कानोसा”, “गोईण” ह्या पुस्तकांमुळे व अनिल अवचट ह्यांच्या “शोध आरोग्याचा” (साप्ताहिक सकाळ, दिवाळी अंक १९९४, शिवाय कार्यरत) ह्या लेखामुळे महाराष्ट्राला सुपरिचित आहे. त्यांच्या सामजिक कार्यामुळे व त्यांच्या वैद्यकिय क्षेत्रातील ज्ञानामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. अभय बंग व राणी बंग ह्यांच्या SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) संस्थेने बालमृत्यू रोखण्यासाठी ‘अंकुर’ प्रकल्प हाती घेतला त्या अनुभवांचे हे पुस्तक.

अभय बंग ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात –

मुले का मरतात? त्यांना कसे वाचवता येईल?
गडचिरोली जिल्ह्यातील ३९ गावात व नंतर ‘अंकुर’ प्रकल्पाद्वारे महारष्ट्रातील जवळपास १०० गावात या प्रशनावर प्रभावी उत्तर शोधण्याचे प्रयोग आम्ही गेल्या १५ वर्षात केलेत. उत्तर सापडले.
गावातील आई व बाळाची काळजी त्यांच्या घरातच घेण्यासाठी व लहान मुलांच्या आजाराच उपचार करण्यासाठी गावातील बायांनाच सक्षम बनवणे हा तो उपाय.

हेमंत कर्णिक यांचे ‘इथे ओशाळला बालमृत्यू’ हे त्या उपायबद्दलचे पुस्तक, जे त्यांनी स्वत: तिथे राहून, खेड्यापाड्यात राहून, आरोग्यदुतांशी बोलून लिहिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दर एक हजार जिवंत जन्मांमधे, १२० बाळं पहिले वर्ष पूर्ण होण्याच्या आत मरत होते तिथे काही वर्षातच अंकुर प्रकल्पानंतर हा दर ३० च्याही खाली गेला. हा चमत्कार घडला तो साध्या-सोप्या पण प्रभावी उपायांमुळे. साधे, सोपे सहज करण्यासारखे व अतिशय परिणामकारक उपाय ही अभय बंग यांची खासियत. त्यांचे उपाय हे ह्याच मातीतले, साधे पण विचारपुर्वक योजलेले असतात आणि म्हणूनच इतके प्रभावी. अंकुरमधील masterstroke म्हणता येइल अशी योजना म्हणजे गावातील बायांनाच निवडून, प्रशिक्षण देऊन, आरोग्यदुत बनबणे ही. ह्या बायांना गावातील कुठल्याही घरात प्रवेश असतो आणि कुठल्याही वेळी गरज पडल्यास जाण्याची तयारी असणे; अशी त्यांच्या निवडीची पूर्वअट आहे. ह्यांच्यामधील बहुतेक स्त्रीया ह्या अल्पशिक्षित आहेत तरीही प्रशिक्षणानंतर अतिशय सक्षमपणे व जवाबदारीने त्या आपले काम पार पाडतात. त्यांना योग्य ती औषधे, इजेक्शन (योग्य प्रशिक्षणासह) अंबू बॅग, मास्क, बिल्टा पंप, गरम बॅग, ब्लँकेट अशी उपकरणे दिली आहेत जी त्या वेळ पडल्यास योग्य रितीने वापरून बाळाचे प्राण वाचवू शकतात. महत्वाचे म्हणजे, ह्याब्रोबरच संभाषण कौशल्य आणि आपल्या मर्यादंची जाणीवही त्यांना करून दिली आहे. त्यामुळेच कधी बाळाला दवाखान्यात हलवायचे हे देखील त्यांना कळते.

ह्या सर्व गावांमधे अशिक्षित, अल्पशिक्षित गरिब वस्ती बहुसंख्य आहे, साहजिकच रुढी/परंपरा व अंधश्रद्धा यांचा पगडा अधिक आहे. हे असूनही ह्या गावांमधे आरोग्यदुतांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांनी मिळालेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर premature deliveries, underweight babies अशा केसेस यशस्वीपणे हाताळल्या आहेत, तेही घरच्या घरी, हॊस्पिटल मधे न हलवता. हे काम करतांना रंजना शिंदे, कुसुम वाघमारे, बिबी नदाफ अशा कित्येक आरोग्यदुतांना आत्मविश्वासाने काम करण्याची, समाजात प्रतिष्ठेने जगण्याची संधी मिळाली. ह्या सर्वांपेक्षाही कौतुक वाटते ते अभय बंग (अर्थातच राणी बंग देखील) ह्यांचे – trained nurse चा आग्रह न करता, गावातील महिलांनाच योग्य प्रशिक्षण देऊन ह्या केसेस यशस्वीपणे हाताळल्याबद्दल. आणि त्याचाच परिणाम म्हणून बालमृत्युंचा दर जाणवण्याइतका कमी झाला. ह्याशिवाय ह्या कामातील सहभागामुळे आरोग्यदुत महिलांना आलेला आत्मविश्वास, त्यांना मिळलेला मान असे कित्येक फायदे वेगळेच. ह्या सगळ्यात भावते ती बंग यांची परिसरातील लोकांना उपक्रमात सहभागी करून घेण्याची वृत्ती आणि कौशल्य. तळागाळातील लोकांच्या जिवनात घ्दवलेल बदल, जगवलेली बाळं – ज्यांना अपुर्‍या साधनसामग्रीअभावी, आणि अज्ञानामुळे जगण्याची संधीच मिळाली नसती. कौतुक वाटते त्यांच्यातल्या संशोधकाचे ज्याने अल्प खर्चात तळागाळातील (grassroots) लोकांना उपयोगी पडावीत म्हणून नाविन्यपूर्ण उपकरणे बनवलीत. ‘साधनसामग्री, वैद्यकिय सुविधा, पुरेशा कुशल मनुष्यबळाच्या अभावी, अज्ञानाने आणि अंधश्रद्धेने ग्रासलेल्या समाजासाठी काय करू शकतो?’ अशा प्रश्नांना कृतीनेच (किंवा कृतीमुळेच) इतके प्रभावी उत्त्तर दिले. अंकुर प्रकल्पाचे यश हे अभय बंग व राणी बंग ह्यांच्या कुशल नियोजनाचे व व्यवस्थापनाचे आहे.

पुस्तकात जर अंकुर प्रकल्पाच्या प्रशिक्षण पद्धतीविषयी जर सविस्तर माहिती असती तर अधिक उपयोगी झाले असते, तसेच शेवटचे प्रकरण/समारोप फारच संक्षिप्त, आटोपता घेतल्यासारखा वाटतो. पण ह्या छोट्यामोठ्या त्रुटींसहितही पुस्तक प्रभावी झाले आहे. ‘अंकुर’ सारखा एक सामजिक स्वास्थ्याशी निगडित प्रकल्प किती प्रभावीपणे राबवता येतो हे दिसून येते. “जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाला जगण्याच हक्क आहे…” ही सामुदायिक शपथ देणार्‍या अभय बंग व राणी बंग ह्यांच्यासारख्या व्यक्ती आजच्या काळात आपल्याच समाजात आहे, हे आपलेच सुदैवच नाही का?


ता. क. – हेमंत कर्णिक ह्यांचे इतर काहिच वाचले नाही हे खरे आहे (होते), पण सर्च च्या साईट वर त्यांचा हा लेख (अशी सापडावी वाट) वाचला – फारच सुरेख, प्रांजळ आणि अंर्त:मुख असा हा लेख आहे. त्यातली त्यांची शैली अतिशय ओघवती आणि लोभस वाटली.

Advertisements

3 thoughts on “इथे ओशाळला बालमृत्यू

  1. Mr Karnik has written good experiences about the child birth and child health care by the search project with help of Midwife
    called Aarogayshoot

    Really good book by Karnik.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s