मीडिओक्रिटी…


भडकमकर मास्तरांनी ‘साठेचं काय करायचं?‘ ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला ‘राजीव नाईक’ ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला…

आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा? विचार करत राहिलो, आणि जे सुचले ते इथे मांडायचा प्रयत्न करतो आहे….

मला वाटते, स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो कारण त्यात मीडिओक्रिटी नाकारण्याची (denial) स्टेज संपतच नाही. तिचा ‘acceptance’ ही सगळ्यात अवघड गोष्ट. मग त्यातूनच अपरिहार्यपणे येणारी कौतुकाची, टाळ्यांची लाचारी आणि त्या(च)साठीचे केविलवाणे प्रयत्न… किंवा त्यातूनच निर्माण होणारे असूया/मत्सर्/द्वेष जे ह्या नाटकात दाखवले आहे. ह्या भावना सर्वसामान्य आणि त्यावरील प्रतिक्रियाही लेखकाने म्ह्टल्याप्रमाणे रिपीटिटीव्ह…त्याच, त्याच आवर्तात, भोवर्‍यात पुन्हा, पुन्हा अडकल्यासारख्या….अगदी अनुभवलेली, वास्तववादी script!

जरा दूर जाऊन, दूरस्थ (त्रयस्थ नाही, पण भावनावेगापासून दूर ह्या अर्थाने – दूरस्थ) राहून विचार करत होतो तेंव्हा वाटले, खरच मीडिओक्रिटी हे एक perception (नेमकं काय म्हणू याला?) शिवाय दुसरं काय आहे? म्हणजे तसे बघितले तर “बेस्ट” हे कोणाच्या तुलनेत? आपल्या वर्तुळातील सहकारी, मित्र-मैत्रिणींच्या की आपल्या गावात, राज्यात, देशात, परदेशात्/विश्वात??? कुठल्या तुलनेत म्हणायचे हे “बेटर” आणि “बेस्ट” आणि मग ही स्पर्धा कोणाशी, कोणा-कोणाशी किंवा कोणा-कोणाच्यात? आणि वेळेचे अजून एक डायमेंशन धरायचे की नाही? म्हणजे सचिन तेंडुलकर हा “बेस्ट” बॅटसमन – हा समकालीन खेळाडुंमधे की त्याची तुलना मग डॉन ब्रॅडमन शी किंवा अजूनही कोणाशी? बर मग सचिन जर “बेस्ट” तर मग बाकिच्यांनी बॅटिंग करुच नये का? अगदी ज्ञानेश्वरीतच (दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनी) म्हटले आहे – सगळ्यात सुंदर चाल राजहंसाची असली तरी इतरांनी चालुच नये का? सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट एलिस हेच REBT मधे सांगतो!

विचार केला की पटते की आपल्यालाही…अरे असेल लता मंगेशकरचा आवाज स्वर्गीय; पण म्हणून कोणी गायचेच नाही का? का म्हणून तिचे कुठलेही गाणे “बेस्टच”? मी तर आशाच्या ‘कतरा, कतरा…” वर जीव ओवाळून टाकायला तयार आहे. एवढेच नाही तर ‘स्वानंद किरकिरे’ च्या ‘बावरा मन…” वर हजारो गाणी कुर्बान….काय वेडावून टाकते ते गाणे!! असेल आंबा फळांचा राजा, पण संत्र्याला स्वतःची चव आहे, उसाच्या रसाला आगळेच माधुर्य आहे. अरे, असेल सचिन बेस्ट, पण युवराजचा लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह लाजवाब, त्याचा माज पैसा वसूल (२०-२० चे सहा सिक्स? आणि आठवा फ्लिंटऑफ चा चेहरा) आणि गांगुलीचे ऑफ-साईड चे फटके….अफलातून! 🙂

मग ह्या मीडिओक्रिटी च्या perception चे दुसरे टोक, शिखर म्हणू हवे तर – ते “पर्फेक्शन”..ते काय? जर ते ‘पर्फेक्ट’ असेल तर ते नेहमीच ‘बेस्ट’ हवं…मग पुन्हा तो प्रश्न, की तुलना करायची तर कशाशी आणि कोणा-कोणाशी? एक परिघ वाढवले की हे सगळेच किती फोल आहे, हास्यास्पद आहे हे जाणवू लागते…आणि मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे हेही जाणवते…पर्फेक्शनचा, परिपुर्णतेचा ध्यास, विलोभनीय आहे पण परिपुर्णतेचा अट्ट्हास??? विचार करण्यासारखा प्रश्न आहे….ध्यासात भर आहे तो आपल्या कर्तुत्वावर (प्रोसेसवर), तर अट्ट्हासात अवाजवी भर आहे त्याच्या अनुकुल परिणामांवर (रिसल्ट्सवर)…शिवाय perfection is not a certain/fixed set of XYZ items or formulae. Otherwise perfection would be stagnation.

Hugh Prather म्हणतो, “There is no such thing as ‘the best’ in the world of individuals!” सही आहे!!!

किंबहुना, ह्यातुनच वाटले की जर खरोखरच जे करतो ते मनापासून आवडत असेल, ते करण्यात मजा येत असेल (process satisfaction) तर इतका त्रास होईल का? नैसर्गिक हेवा वाटेल कदाचित, पण चढत्या भाजणीने हे असूया/मत्सर्/द्वेष मनस्वास्थ खराब करतील? ह्या गळाकापू स्पर्धेत खरच आपण process satisfaction विसरत आहोत का? End goal satisfaction हेच एकमेव ध्येय झाले आहे? कॉर्पोरेट जगात हे नेहमीच दिसते पण कलेच्या, सर्जनशील जगात जेव्हा राजीव नाईक ह्यांनी असे लिहिले, तेंव्हा अंगावर सरसरून काटा आला…पण शेवटी कॉर्पोरेट जगात किंवा सर्जनशील जगात, कुठेही असला तरी माणूस हा माणूसच – त्याच्या सगळ्या गुणावगुणांसह!

जर ह्या संदर्भात – बेस्ट/पर्फेक्शन त्याची कॅलिडोस्कोप प्रमाणे दिसणारी विविध रूपं, त्याची relativity (आता मला आवडते आशा जास्त, लताचा आवाज स्वर्गीय आहे मान्य करून सुद्धा!), त्याप्रमाणे स्वतःचे स्वतःच्या मीडिओक्रिटी चे perception आणि process satisfaction; ह्या संदर्भात विचार केला तर मीडिओक्रिटी स्विकारायला, पचवायाला जमेल; इतकेच नाही तर त्याच्यावर मात करायलाही जमेल असे वाटते.

आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते….जमेल तसे….आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट….परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही…आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे… बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय…कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक….आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने…स्वांतसुखाय! 🙂

हे एकदा आतून उमगले की नाही कलह होत स्वत:शी, स्वतःच्या मीडिओक्रिटीशी…अर्थात, हे सगळे माहित असले तरी ‘माहित असणे’ आणि ‘उमगणे’ ह्यात खूप अंतर असते…अंतर असते कदाचित कित्येक वर्षांचे, कधी कधी कित्येक आयुष्यांचे….आणि आयुष्य संपले तरीही न उमगणे ही पण एक दुर्दैवी शक्यता…आणि त्यात ‘राजीव नाईक’ म्हणतात तसा तो ‘भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार’ आणि त्याचे ते ‘रिपीटिटीव्ह’ अविष्कार! भयानकच पण सत्य!! हे नाटक नक्कीच बघणार …जमले तर पुस्तक मिळवतो आधी.

असो!! फार वाहवत गेलो….एकातून एक…लाऊड थिंकींग म्हणा! तुम्हाला काय वाटते, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया जरूर लिहा!

6 thoughts on “मीडिओक्रिटी…

 1. प्रत्येक कलाकाराला कधितरी एक टप्प्यावर येउन हे प्रश्न छळत असावेत…….

  तस म्हन्टल तर mediocre and perfect या concepts realtive आहेत….

  कलानिर्मिती ही जेव्हा स्वतसाठी केली जाते तेव्हा स्पर्धा उरते ती मग स्वतशिच..त्यात मग परिघ हि स्वतच अनि चढाओढहि स्वतशीच….
  पण कशाला करत बसावा हा कलह……………….
  जे आवडेल ते करत जगाव…..कुणाशीच तुलना न करता…फ़क्त स्वान्तसुखाय एवढाच हेतु ठेवुन…….. हा सगळ्यात सुन्दर आविष्कार असेल…………….

  मी हे नाटक पाहिलेल नाही पण बघायचे आहे आणि आता नक्किच बघेन.

 2. सहज म्हणून इथे आले आणि इतकं छान वाचायला मिळालं 🙂 तू म्हटलयस तसं हे लाऊड थिंकिंग नक्कीच नाही. समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं आहे. पण लिहिताना तू ते फ़ार गुंतागुंतीच लिहिलयस असंदेखील वाटतयं… मुळातच जसं दुसऱ्याच्या creativity शी आपली तुलना होऊ शकत नाही तसं आपणही आपल्या creativity ला कोणाबरोबर का compare कराव… इतकं साधं वाटतं मला हे… वाटतो तितका हा acceptance कठिण नाही.
  तरिही तू दिलेली उदाहरण मस्त आहेत आणि “दुरस्थ” हा शब्द पण आवडला!

 3. aapali nirmitee kshamata ( apan tyala n.k.mhanu) apan spardha, paisa yanchyashi jodali nahi, tar tyatun hi ashi khant nirman honar nahi.jasa apala twachecha rang, apala avaj, tashi apali n.k. tyala kami kinva jast samajayche kashala? dusaryanchya nirmiti cha anand gheu shakato, aani apan hi nirmitee karu shakato.

 4. wa!
  babachya yaa likhaaNanantr aaplyasarkhya mediocre cha thinking aaNi genius cha thinking yaatla farak khoop kahi sangoon gela!

  mediocritycha perceptionchya andhaarat suryaacha ek chaan , bright kavDsaa paDlaa!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.