देणे समाजाचे…


क्षिप्रा कडून खो मिळून बरेच दिवस झाले पण लिहायला जमतच नव्हते. शेवटी आज योग आला.

“देणे समाजाचे” खरच फारच मोठा शब्द आहे. पण आपल्यापैकी खूपजणांना असे वाटते की दुसर्‍याठी आपल्या परीने जेवढे जमेल तेवढे काहितरी तरी करावे. मी पण अशाच पेचात होतो. मध्यंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळघरात जाऊन तेथल्या मुलांना थोडाफार कॉम्प्युटर शिकवला तेव्हाच जाणवले की आपल्याला जे अगदी बेसिक वाटते ते दुसर्‍या क्षेत्रातील माणसाला नवीन असू शकते. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते त्यांना खूप उपयोगीही पडू शकते हे पाहून फारच छान वाटले!

आपले थोडेबहुत ज्ञान, थोडीशी मदत दुसर्‍या कोणाला खूप उपयोगी पडू शकते हा अनुभव खूपच उत्साहवर्धक होता. त्यातुनच मग बरेच दिवस चर्चेत असलेल्या अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीच्या “पैसा फंड/बचत गट” ह्या कल्पनेनी उचल खाल्ली आणि शेवटी काही guidelines ठरवून स्टेट बॅंकेत ह्या बचत गटाचे खाते उघडले. आम्ही ७-८ जण (मी, अजित, अमित, यशोदा, मयूर, गीतांजली, रूपाली, संदीप आणि तेजश्री) ह्या गटाचे core members आहोत आणि स्वत: जमेल तसे पैसे ह्या खात्यात भरतो, त्याशिवाय इतरांनाही ह्या उपक्रमाची माहिती देऊन जर त्यांची इच्छा असेल तर त्यांचीही मदत ह्या खात्यात जमा करतो. इथे १००% पारदर्शकता असेल हे आम्ही स्थापनेपासूनच ठरवले होते आणि त्यानुसारच प्रत्येक महिन्याचे account statement हे अनिल अवचट ब्लॉगवर तसेच अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीवर प्रसिद्ध करतो.

बर्‍याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे आणि आम्हीही सध्या २ संस्थांना आर्थिक मदत करायची ठरवली आहे. त्यापैकी एक आहे – खेळघर, ही संस्था गरीब वस्तीतील मुलांना शिक्षणासाठी मदत करते आणि खूप चांगल्या तर्‍हेने त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देते. दुसरी संस्था आहे – निराधार बालसंगोपन अनाथ केंद्र – दापोडी जिथे मालनताई ह्या लहान अनाथ मुलांची जिवापाड काळजी घेतात. आमच्यापैकी कोणी ना कोणी ह्या दोन्ही संस्थांशी चांगलेच परीचित आहोत, आम्ही स्वत: तिथे जाऊन त्यांचे काम पाहिले आहे, त्यांच्याशी बोललो आहे आणि ह्या दोन्ही संस्था चांगल्या आहेत हे अनुभवले आहे. सध्या ह्या दोन्ही संस्थांना ६ महिन्यासाठी मदत करायचे आम्ही ठरवले आहे!

ही नुकतीच सुरुवात झाली आहे, आणि जिथे आमच्या छोट्या मदतीनेही फरक पडेल तिथे जमेल तशी मदत करायची आमची इच्छा आहे. पैशापलिकडेही जाऊन जर प्रत्यक्ष तिथल्या कामात, प्रकल्पात (जसे वेबसाईट तयार करून देणे, काही इतर तांत्रिक मदत पुरवणे वगैरे) प्रत्यक्ष मदत करता आली तर आम्हाला अधिक आवडेल. फक्त आम्हीच नाही, तर अशा मदतीची इच्छा/गरज असलेल्या व्यक्तिंना आणि संस्थाना एकमेकाची माहिती पुरवणे अशा प्रकारे दुवा बनायलाही आम्हाला आवडेल.

मला ह्या सगळ्यातुन मिळणारा आनंद खूप निर्भेळ, उत्साहवर्धक आहे. खरं तर हे करायचे ते दुसर्‍या कोणासाठी नाही; तर डॉ. आनंद नाडकर्णी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याच ‘भावनिक स्वार्थासाठी’! 🙂


बचत गट/पैसा फंडाविषयी जास्त माहिती अनिल अवचट ब्लॉगवर इथे वाचता येईल – बचत गट
आणि मदत करायची असल्यास सगळी माहिती तिथे उपलब्ध आहे. जर पैसा बचत गटाला न देता कुठल्याही संस्थेला थेट मदत करायची असेल तरीसुद्धा संपर्क करा, आम्ही जमेल ती सगळी मदत करू! गरजू आणि चांगल्या कामांना पैसा मिळावा अशी आमची इच्छा आहे, तो पैसा आमच्याच कडून मिळावा हे जरूरी नाही!
Advertisements

One thought on “देणे समाजाचे…

  1. kshipra says:

    ह्याची लिंक माझ्या ब्लोगवर दिली आहे. धन्यवाद खो घेतल्याबद्दल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s