एक कविता आठवतांना…My Sorrow


यशवंतच्या कविता वाचल्यावर काही जुन्या कविता उगाच चाळल्या…आश्चर्य म्हणजे, पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. १९९७ ला लिहलेली. ती मनस्थिती आजही व्यवस्थित आठवतेय. विशीतच होतो आणि ज्या वयात ‘लाथ मारेल तिथे पाणी काढेल’ असा आत्मविश्वास असतो तेंव्हाच आलेल्या असंख्य अडचणींमुळे आणि अपयशामुळे खूच खचलो होतो आणि नाउम्मेद होतो. मित्रही पांगले होते…खूप एकटा, एकटा झालो होतो. पण कुठेतरी आत खोलवर डिचवलोही गेलो होतो, आणि त्यातूनच एक जिद्द थोडीशी उगवत होती. कुठेतरी स्वतःलाच समजावण्यासाठी थोडी स्वतःचीच philosophy किंवा counseling चालू असायचे, तेंव्हाच कधीतरी झालेल्या ही माझी कविता – My Sorrow. ही आणि ह्याच्या थोडी आधी लिहलेली ‘Why Me?’ ह्या माझ्या कविता आजही मला (माझ्यासाठी) खूप relevant वाटतात.

मला वाटत, दु:ख किंवा वेदना नेहमीच वाईट नसते – जरा ‘पॉसिटीव्ह थिंकींग’ च्या steroids चा ओव्हरडोस झालेले लोकं उगाचच ‘अरे आनंदी रहायचे रे, ग्लास इज ऑलवेज हाफ फुल’ चा डोस देत असतात. कधीकधी ते फारच वैतागवाणे होते. मला वाटतं, अशी आतून हलवून टाकणारी दु:ख/वेदना आपल्याला खूप काही शिकवून जाते. स्वतःविषयीच एक वेगळीच, खोल insight देऊ शकते. जगाविषयी किंवा इतरांविषयी एक सहानभुतीचा, समजुतदारपणाचा दृष्टीकोन देऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नकळत किती गोष्ट गृहीत धरतो हे जाणवते. ह्यातूनच मग कधीतरी, ‘ मीच का’, Why Me? ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही हे उमगायला लागते…तसं वागायला जमतंच अस नाही, पण निदान विचारात तरी थोडी मॅच्युरीटी येते. दु:खाविषयी बोलणे किंवा त्याचा खूप विचार करणे हे नेहमीच नैराश्यवादी, ‘दु:ख उगाळणे’ असं नसतं. डोळसपणे आणि संमजसपणे ‘भोगलेल्या’ दु:खाने जे शिकता येते ते इतर कशानेही नाही. आणि अशा दु:खातून किंवा वेदनेतून जन्मलेल्या आशेची/जिद्दीची जातकुळी आणि राखेतून भरारी मारणार्‍या फिनिक्स पक्षाची जातकुळी एकच असते. असं दु:ख हे नैराश्यजनक नाही, ते देते ‘जीवनाविषयी उदास सामंजस्य’. किंबहुना मला ‘उदास’ हा शब्दही नकोसा वाटतो ( जीएंची माफी मागून), मस्त जमलेल्या कॉफीसारखी एक ‘मधूर कडवट’ चव असते त्या सामंजस्याला. शेली म्हणतो तसं ‘Our sweetest songs are those that tell of saddest thought’.

Here is the original Poem – My Sorrow

……..
So here I am, undefeated, undestroyed,
Much stronger than ever before;
And still victorious after all those retreats.
It’s due to my pain, my sorrow;
I am still hopeful about the morrow!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s