एक कविता आठवतांना…Why Me?


ही अजून एक दुसरी जुनी, पण आजही आवडणारी कविता. आयुष्यात बर्‍याच वेळा ‘पण मीच का?’, ‘Why Me?’ हा प्रश्न सतावतोच. कधी अक्राळविक्राळ रूप धारण करून आपण आणि इतर ही दरी इतकी रुंद करतो की एकाकीपण, कोणी समजून गेऊ शकत नाही हा सल प्रत्यक्ष दु:खापेक्षाही जास्त त्रास देतो. Experiences are so personal, they can’t make anyone else wiser! असं म्हणून गप्प व्हायचं. ही कविता अशाच काळत लिहिली आहे जेंव्हा मी खूप हताश आणि निराश झालो होतो. प्रत्येक ठिकाणी निराशा आणि अपयशच हाती येत होते.

अशा वेळेस दुसर्‍या कोणी समजावले तरी फार उपयोग होत नाही. उभारी येते ती स्वतःच्याच विचारांनी आणि जिद्दीने. ही कविता मी अशीच स्वतःचीच philosophy म्हणून लिहलेली. ‘Why Me?’ ह्याला खरं तर काहीच उत्तर नसते. अशा वेळेस इतरांचे खरंच किती छान चालू आहे असे वाटते, आणि आपले भोग आपल्याला दुर्दैवाचे दशावतार दाखवतात. समजून न घेणार्‍या, सहानुभुती नसलेल्या वेदनेने येणारे एकाकीपण हे अतिशय दु:ख देते. ‘काफिला साथ, मगर सफर तनहा’ अशी एकाकी सफर! बर्‍याच वेळा हे ‘Why Me?’ हे ‘माझंच नशीब फुटकं’ अशा self pity किंवा रडगाण्यापुरतेच मर्यादीत होते आणि त्याचेच एक निराशावादी दुष्ट्चक्र बनत जाते. अशा वेळेस – “Oh dear, why do you think you’ll always get what you want?” असा खणखणीत प्रतिप्रश्न स्वतःच्याच मनात उमजला/उमगला तर मग त्यातून बाहेर येता येते, ह्यातूनच मग नंतर कधीतरी, ‘ मीच का’, Why Me? ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही हे उमगायला लागते…तसं वागायला जमतंच अस नाही, पण निदान विचारात तरी थोडी मॅच्युरीटी येते. अशाच काहिशा प्रवासाची ही कविता. कवितेवर थोडासा Beatles च्या ‘Let it be’ चा प्रभाव आहे. हा स्वतःलाच समजावण्याचा एक प्रयत्न मला अजूनही उभारी देणारी वाटतो. तुम्हाला बघा कशी वाटते ही कविता – Why Me

When everyone seemed to sail so smooth, and I had to fight,
When everyone fell asleep, and I was awake all the night!
And all those nights seemed so long,
When almost everything went wrong!
It was all dark, there was nothing I could see,
I asked in the fury, “Why me? Why me?”

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s