निळा पक्षी (with due apologies to Bukowski)


Bluebird
Bluebird

आधी ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे बुकोवस्कीची ‘Bluebird‘ वाचली आणि ती फारच खोलवर रुतली. गेल्या वर्षी बुकोवस्की माहितही नव्ह्ता तेंव्हा साधारण तशाच कल्पनेवर आधारीत माझ्या काही ओळी खरडल्या होत्या. आता काल बुकोवस्कीची ब्ल्यूबर्ड वाचल्यावर ते भूत काही मानेवरून उतरत नाही. It is indeed haunting & inspiring poem. त्याच तंद्रीत अजून काही ओळी लिहिल्या आणि ही कविता पुर्ण केली. लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्‍यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय…

पाठीवर सारे निळे आभाळ घेऊन,
माझ्या खिडकीत बसलेला निळा पक्षी
गाणे स्वच्छंदी आकाशाचे गातो.

खुर्चीतुन पाहणारा मी,
एक मोठा उसासा टाकून
काँप्युटरवर काम करत बसतो.

एक कॉफिचा मग घेऊन,
कुठलीतरी एक मेल उघडून
मी स्क्रीनकडे बघत राहतो,

निळा पक्षी निळाईतच झेपावतो,
मग खिडकीकडे एक नजर टाकून
मी माझ्या खुर्चीत विसावतो

माझ्या आतले निळे आभाळ,
आणि आत चिवचिवणारा निळा पक्षी
आतल्या आतच हिरमुसतो

मनातले आभाळ डोळ्यात
अजिबात उतरू न देता,
मी सराईतपणे सावरतो.

कधीतरी रात्रीच्या नीरव वेळी
स्वांनंदी गाणारा निळा पक्षी
माझ्या आतच गुणगुणतो

त्याच्या सुरात सूर मिसळून
डोळ्यातल्या पावसात त्याला भिजवून
मी हलकेच त्याला गोंजारतो

एरवी स्वतःला कामात गुंतवून,
आणि जगापासून त्याला लपवून,
मी अगदी इतरांसारखाच वावरतो!

© Manish Hatwalne
(7 Feb 2014 –> 9 Feb 2014)

Advertisements

One thought on “निळा पक्षी (with due apologies to Bukowski)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.