एलिझाबेथ एकादशी (Elizabeth Ekadashi)


Elizabeth Ekadashi

Elizabeth Ekadashi

परवाच ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल ‘एलिझाबेथ’ विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण – आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे! “आईचा हात लागतो का?” किंवा ती आज्जी, ती घर-मालकीण हे अगदी तपशीलांसकट मस्त जमलेत आणि कुठेही ओढून-ताणून आणलेले किंवा कृत्रिम संवाद वाटत नाही. छोटे-छोटे प्रसंग जसे – संत न्युटन, दाभोळकरांची हत्या आणि जादूटोणा कायद्याविषयी गैरसमज आणि ते गण्याचे शिव्या देणे, आणि तसेच त्याच्या वडिलांचे शिव्या देणे, रक्त तपासणीच्या वेळेस कुठे उच्चारही न होता त्यांना कशाची काळजी वाटते हे आपल्याला कळतं! ‘डेंजर वस्तीतून’ कॉट आणण्याचा प्रसंग किंवा शेवटी एकादशीला “यंदा ‘आमचा’ धंदा चांगला झाला” हे त्या गणिकेने म्हणणे – हे खास परेश मोकाशीचे स्पेशल टच. अगदी सहज आणि सुचकपणे (subtly) तो बरेच काही सुचवून जातो.

नाही म्हणायला सायकल ‘एलिझाबेथ’ आणि ज्ञानेशचे नाते अजून फुलवायला हवे होते, आणि एलिझाबेथ फारच नवीन (न वापरलेली) दिसते, अगदी रोज स्वच्छ केली तरी सायकलचे टायर झिजतातच!:P आणि उंचावलेल्या अपेक्षांच्या तुलनेत शेवट अगदी सपाट वाटतो. पण तरीही एकूण मस्त जमला आहे – थोडा वेगळा विषय, कोणीही नावाजलेला/ली अभिनेता/अभिनेत्री नसतांनाही छान जमून आलेला सगळ्याच मुलांचा अभिनय, त्यांची ती उर्जा आणि धमाल, तसेच अगदी अस्स्ल वाटणार्‍या आई, आज्जी आणि व्यापारी हेही खासच! चित्रपटातला हायलाईट आहे मुलांचे पैसे कमविण्याचे प्रयत्न, त्यांचा तो बांगड्या विकायचा छोटा स्टॉल, आणि ती सगळी धावपळ बाहेर पडल्यावरही लक्षात राहते!(रेटींगः ३.५/५)

हो! ह्यात काही काडीमात्रही आक्षेपार्ह नाही. देवांचा, संतांचा किंवा न्युटनचा कसलाही अपमान होत नाही! कशाला विरोध आहे नक्की?? कशानेही भावना दुखावतात का?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s