पुस्तके…


पुस्तके झिरपत राहतात कुठेतरी जाणिवेत, नेणीवेत
आणि मग त्यांना अवचितच मनात धुमारे फुटतात

न बघितलेला पण परीचित परीसर, वाचलेली पात्रे
नकळत, वेळी-अवेळी डोळ्यांसमोर पिंगा घालतात

अनोळखी या वाटांवरून चाललोय आपण आधीही कधीतरी
एखादा बालमित्र मॅडसारखा इथेच गळ्यात पडेल असे वाटते

आपण त्यांना विसरलो, मुळात हेही विसरलेल्या कविता
अचानकच नेमक्या वेळी, नेमक्या ओळींसकट भेटतात

आणि काय पाझरत होते नेणीवेत हे तेंव्हा उलगडते
आतल्या आतच फुलणारे ते झाड आनंदाने मोहरते

ज्यांच्या मातीत आपण रुजलो, ज्यांच्या पानांवर आपण पोसलो
ती पुस्तकांची पाळेमुळे किती खोलवर रुजलीत हे उमगते

पुस्तकांशी जुळलेली नाळ, अशी सहजासहजी तुटत नसते
हे देणे अव्यक्त अज्ञाताचे, असे सहजा-सहजी फिटत नसते!

~ मनिष (१/१/२०१६)
© Manish Hatwalne

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s