काव्य, शास्त्र, विनोदाने दरवळणार्या मैफिलीत
हुरळून आपण सामिल होतो.
संवादासाठी, मैत्रीसाठी आसुसलेले आपण
चार दोस्तांच्या सहवासात हरखून जातो.
मैफिलीतल्या अनवट कविता,
एखादी नेमकी दाद,
तिथली व्यासंगी चर्चा,
आणि मनसोक्त गप्पा.
अशा हव्याहव्याशा वातावरणात
आपणच नकोसे आहोत,
हे अवचितच झालेले दंशभान….
शरीरात एखादे विष पसरत जावे
तसा पसरत जाणारा तुटकपणा.
आपल्याच हाताने तोडून सर्व पाश
खुलाशाचाही न करता अट्टहास,
पुन्हा एकदा मौन प्रवास.
एकट्याचा….
कधीही न परतण्यासाठी.
~ मनिष (20/2/2019)
© Manish Hatwalne
Featured image – From The Internet, far too many sites using it to give credit to a specific one. I am using it here with gratitude.