शेंदूर दगडांचा उतरला तरीही, गुलाल भक्तीचा उधळत राही धुरळ्यात काही उमजत नाही, पावलांवर पाऊल पडत राही झापडे काढली डोळ्यांची तरीही उजेडाला डोळे हे सरावत नाही रक्त सांडले कळपात तरीही मेंढरे लांडग्याला ओळखत नाही पाणी डोळ्यातले रोखले तरीही लेखणीतून मग ते झरत राही ~ मनिष
© Manish Hatwalne (21-March-2022)