जो भी बिछडें है,कब मिले है फराज़….

Ahmed Faraz - Image courtesy Internetआज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे – पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता. २००४ मधे त्यांना त्यांच्या साहित्यासाठी पाकिस्तानात हिलाल-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळाला होता, तो २००६ ला परत करतांना ते म्हणाले होते (विकीपिडीया च्या माहितीवरुन साभार) –

“My conscious will not forgive me if I remained a silent spectator of the sad happenings around us. The least I can do is to let the dictatorship know where it stands in the eyes of the concerned citizens whose fundamental rights have been usurped. I am doing this by returning the Hilal-e-Imtiaz (civil) forthwith and refuse to associate myself in any way with the regime…”

एका पतिभावान कवी शिवाय ते एक अतिशय सुसंस्कृत, विद्वान व्यक्तिमत्व होते. मला अर्वाचीन शायरांमधे त्यांची रोमँटीक शायरी अतिशय आवडते. रोमँटीक शायरीतही त्यांच्या कल्पनांचे नावीन्य, हळूवारपणा, हळवेपणा हा खूप भावतो. जसे –

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

त्यांच्या कित्येक गज़ला ह्या मेहदी हसन, गुलाम अली आणि जगजीत सिंग ह्यांनी गायल्या आहेत. त्यातली मेहदी हसनने गायलेली `रंजीश ही सही…’ ही अतिशय गाजलेली गज़ल. त्याशिवाय ‘अब के हम बिछडे’, ‘दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला’, ‘कठीन है राहगुजर’, ‘करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे, गज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊँ उसे’, ‘जो भी दुख याद न था याद आया’, ‘ज़िन्दगी से यही ग़िला है मुझे’, ‘फिर उसी राहगुजर पर…शायद’, ‘शोला था जल-बुझा हूँ’, ‘ये आलम शौक का देखा न जायें’ (त्यातील खास करुन कडवे – “फराज़ अपने सिवा है कौन तेरा, तुझे तुझसे जुदा देखा न जायें|” फारच सुरेख!), ‘ख्वाब मरते नहीं’ अशा कित्येक एकापेक्षा एक सरस गजला/नज्म आठवतात…गज़ल गाणारे गायक खूप प्रसिद्धी मिळवतात, पण त्यामानाने हे सुंदर शब्द लिहिणारे, त्या हळूवार भावना लिहिणारे कवी कित्येकदा अपरिचितच राहतात, त्याबद्द्ल खंत वाटते. ‘रंजीश हि सही ‘ माहित नसलेला गज़ल प्रेमी विरळाच, पण त्याचे शायर ‘अहमद फराज़’ होते हे कितीजणांना माहित असेल? असो!

हीच ती गाजलेली रंजीश हि सही

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिए आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफ़ा है तो जमाने के लिए आ
कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-खुश-फ़हम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिए आ

-अहमद फ़राज
(मरासिम = नाती, relations; पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान, depth/pride of love; लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, taste of tears/sorrow; महरूम=वंचित, devoid of)

रंजीश हि सही इथे ऐकता आणि बघता येईल –

आणि ही माझी स्वतःची आतिशय आवडती अब के हम बिछडे…

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

ढुंड उजडे हुए लोगों मे वफा के मोती,
ये खजाने तुझे मुमकीन है खराबों मे मिले।

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनो इन्साँ है तो क्यों इतने हिजाबों मे मिले।

गमे-दुनियाँ भी गमे-यार मे शामिल कर लो,
नशा बढता है शराबें जो शराबों मे मिले।

अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’,
जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।

– अहमद फराज़

(खराब=खंडहर, हिजाब=गोशा, veil, सराब= भास, illusion )

अब के हम बिछडे इथे ऐकता आणि बघता येईल –

माझी ह्या जेष्ठ कवीला माझी छोटीशी श्रद्धांजली. त्यांची लेखणी आता ‘ख्वाब कभी मरते नहीं…’ अशा आदर्शवादी, आशावादी किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले, जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।’ अशा हळुवार रचना लिहिणार नाही…


अवांतर – मेहदी हसन कित्येक वेळा ‘रंजीश ही सही’ गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर ’तालिब बाग़पती’ ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ ‘रंजिश ही सही’ ह्या गज़ल मधे ते नाहित.

ते अशआर असे –

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ|

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|

काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून ‘रंजिश ही सही’ ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही — आणि अर्थातच शायरही तो नाही.